You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
अनादि काळापासून जगाची वास्तविकता जाणण्यासाठी मनुष्य प्रयत्नशील आहे. परंतु तो खरे काय ते जाणू शकलेला नाही. मुख्यतः वास्तविकतेत, ‘मी कोण आहे ? या जगाला चालविणारा कोण आहे? तसेच जगाचा रचनाकार कोण आहे ?’ हे जाणून घ्यायला हवे. प्रस्तुत संकलनात खरा कर्ता कोण आहे, हे रहस्य उघड केले आहे. सामान्यतः काही चांगले झाले तर ‘मी केले’ असे तो मानतो आणि वाईट झाले तर दुसऱ्यावर आक्षेप घेतो की ‘त्याने बिघडविले.’ नाही तर ‘माझी ग्रहदशा बिघडली आहे’ असे बोलतो, किंवा ‘देवाने केले’ असा आरोप पण करतो. या सर्व राँग बिलीफस् (चुकीच्या मान्यता) आहेत. देव काय असा पक्षपात करणारा आहे का, की तो आपले नुकसान करील ? हे जग कोणी बनविले ? जर कोणी बनविणारा असेल तर मग त्याला कोणी बनविले? मग त्या बनविणाऱ्याला कोणी बनविले ? म्हणजे या गोष्टीचा अंतच नाही. आणि दुसरा असाही प्रश्न पडतो की, जर त्याला जग बनवायचेच होते तर त्याने असे जग का बनविले की ज्यात सर्व दुःखीच आहेत ? कोणीच सुखी नाही ? म्हणजे त्याची मौज आणि आमची शिक्षा, हा कसला न्याय? या काळात कर्त्या संबंधीचा सिद्धांत पहिल्यांदाच विश्वाला यथार्थपणे परम पूज्य दादा भगवानांनी दिला आहे, आणि तो असा आहे की जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही. या जगाला रचणारा किंवा चालविणारा कोणीही नाही. हे जग सायंटिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्सने चालत आहे. ज्याला परम पूज्य दादाश्री ‘व्यवस्थित शक्ती’ असे म्हणतात. जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही, परंतु सगळे नैमित्तिक कर्ता आहेत, सगळे निमित्त आहेत. गीतेत पण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, हे अर्जुना! तू युद्धात निमित्तमात्र आहेस, तू युद्धाचा कर्ता नाहीस. प्रस्तुत पुस्तिकेत कर्ता कोण, याचे रहस्य परम पूज्य दादाश्रींनी साध्या सरळ भाषेत, हृदयात उतरेल अशा प्रकारे समजावून सांगितले आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book जगत कर्ता कोण?.