You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
भगवद्गीता माहित नाही असा सुशिक्षीत मराठी माणूस विरळाच. परंतु योगवासिष्ठ किंवा महारामायण हा ग्रंथ न वाचलेले अनेक सज्जन आहेत. श्रीरामाचा जन्म त्रेता युगातला तर श्रीकृष्णाचा जन्म हा द्वापार युगाच्या अखेरीस. म्हणजे या दोघांच्या जन्मातील अंतर हे कमीतकमी ८६४००० वर्षे आहे. वासिष्ठ ऋषींनी रामाला उपदेश करताना भविष्यात श्रीकृष्ण-अर्जुन हे नर (अर्जुन)-नारायण (श्रीकृष्ण) अवतार घेतील व महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन युद्धास नकार देईल. अशा वेळी श्रीकृष्ण अर्जुनाला बोध करतील हे स्पष्टपणे सांगतात. तोच बोध २५४ श्लोकात गुंफला आहे. हीच योगवासिष्ठांतर्गत गीता.
.
You may visit www.ganeshgita.in
Re: Gita in Yogavasistha (e-book)
योगवासिष्ठांतर्गत गीता.
हे छोटे पुस्तक नुकतेच वाचायला मिळाले. अनेक श्लोक हे गीतेतील श्लोकांशी मिळते जुळते आहेत.
जरी भगवद्गीता अनेक वर्षे वाचीत होते तरी हाच विषय रामायण काळात म्हणजे एका वेगळ्या युगात जवळजवळ ९ लक्ष वर्षे महाभारत युद्धापूर्वी वसिष्ठ ऋषींनी मांडला हे अद्भूतच. वसिष्ठ हे त्रिकालज्ञानी होते याची साक्ष पटते. हे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.
माधुरी केतकर.