Ratings & Reviews

Yin-Yang

Yin-Yang

(4.75 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

4 Customer Reviews

Showing 4 out of 4
Leena Sohoni 10 years, 2 months ago

Re: Yin-Yang (e-book)

लेखकाच्याच शब्दात सांगायचं तर गूढ आणि विज्ञान यांच्या संधीप्रकाशात घडणाऱ्या या कथा आहेत. चीनी तत्वज्ञानानुसार यीन आणि यांग या संकल्पनांमधून वरकरणी परस्परविरोधी वाटणाऱ्या शक्ती प्रत्यक्षात एकमेकींशी एका सूत्राने कशा गुंफलेल्या असतात, या सगळ्या सृष्टीचा समन्वय आणि समतोल साधण्यासाठी त्या कशा अत्यावश्यक असतात, एकीतून च दुसरी कशी जन्म घेते हे स्पष्ट केलेलं आहे. लेखकाच्या कथेतही शक्य आणि अशक्य, तर्क्य आणि अतर्क्य, वास्तव आणि गूढ , सैन्द्रिय आणि अतीन्द्रिय यांचा असाच अत्यावश्यक मिलाफ पाहायला मिलतो. मुखपृष्ठावरील कृष्ण धवल रेखा कृती मधून सुद्धा परस्पर विरोधा मधील या एकात्मतेच दर्शन घडतं . या पुस्तकातील कथे विषयी बोलायचं झालं , तर खरोखर तिन्हीसांजेच्या शांत वेळी फेरफटका मारायला एकटच बाहेर पडाव, बघता बघता पाय अनोळखी रस्त्याकडे वळावे आणि अचानक विजेचा कल्लोळा प्रमाणे सरसरून कसल्यतरी प्रकाशानं आसमंत उजळून निघावा , तसं बेमालूमपणे एक अतर्क्य गूढ समोर उभं ठाकतं. ते आपल्याला नजरेआड करता सुद्धा येत नाही. असा अंधार उजेडाचा संगम तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्यात कधी न कधी घडलेला च असतो. कुणाचाही विश्वास बसणार नाही असे, शब्दात न मांडता येणारे अनुभव आपणा सर्वाना आलेले असतात. स्वतः ला तर्का चा मेरुमणी मानणाऱ्या आपल्या एखाद्या मित्रांला देखील एकदा न एकदा तरी इतक्या अशक्य गोष्टीला सामोरं जावं लागतं , की तो सुद्धा हात टेकतो .

यीन यंग पुस्तकातील प्रत्येक कथा अशीच सध्या सुध्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रसंगावर बेतलेली आहे. यातली माणसं , त्यांची भाषा, बोलण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धती , त्यांची अभिव्यक्ती, त्यांच्या भाव भावना , हे सगळं काही तुमच्या आमच्या सारखच असतं. पण त्याचं ते सरळ साध आयुष्य जगत असताना अचानक ती माणसं एका अद्भुत , गूढ , अतर्क्य अनुभवाला सामोरं जातात. हा अतीन्द्रीय अनुभव कधीतरी कथेतील रहस्याची उलगड करण्यासाठी लेखक वापरतो, तर कधी वाचकालाच एक प्रश्न कथे च्या शेवटी टाकून त्याची मती कुंठीत करून टाकतो . कॅप्टन सुळे यांची शब्दावरची पकड फार सुरेख आहे, भाषा खिळवून टाकणारी आहे.शैली सहजसुंदर पण उत्कंठावर्धक आहे. प्रत्येक कथेची मांडणी नेटकी असून पाल्हाळ कुठेच नाही. कथेच्या ओघात येणारे संवाद नैसर्गिक वाटतात. हे पुस्तक वाचकान आवडेल यात शंका नाही

meghashri_dalvi 10 years, 3 months ago Verified Buyer

Re: Yin-Yang (e-book)

"ब्लॅक अँड व्हाइट" म्हणजे अत्यंत वेगळ्या विषयावर अत्यंत हुशारीने लिहिलेली एक अप्रतिम कथा आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या विज्ञानाकडे/तंत्रज्ञानाकडे कधी कधी आपलं दुर्लक्ष होतं. पण त्यातले बारकावे शोधून त्यावर एक सुरेख कथा लिहिल्याबद्दल कॅ. सुनील सुळे यांचं मन:पूर्वक अभिनंदन!

या संग्रहातली प्रत्येक कथा अशी वेगवेगळ्या अनोख्या विषयांवर आहे. आणि त्या विषयांवर मोजक्याच शब्दात एक संपूर्ण कथा उभी करण्यात सुळे यांचा हातखंडा दिसून येतो.

"पोकळी" या कथेतला विषयही असाच - एकदम आगळा. ही मला संग्रहातली सर्वात आवडलेली कथा.

कॅ. सुनील सुळे - तुमच्या पुढच्या संग्रहाची वाट पहात आहे.

potnissmita7 10 years, 4 months ago Verified Buyer

Re: Yin-Yang (e-book)

यिन यांग मधील कथासंग्रह म्हणजे चढती भाजणी आहे. एक कथा वाचली. ती आवडली. दुसरी कथा त्याहून आवडते आणि त्यानंतर एकही कथेत हा क्रम चुकत नाही. कथा अधिकाधिक आवडतच जातात. पण, म्हणून उलट्या क्रमाने वाचायला गेल तरी माणूस फसेल कारण तिथेही चढती भाजणीच आहे. उतरती भाजणी होतंच नाही. यातल्या कथा किती ही वेळा वाचल्या तरी तोच आनंद देतात. कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात हे आणखी एक वैशिष्ट्य ! सगळ्याच कथा अत्यंत उत्तम आहेत. अफाट लिखाण !

स्मिता पोतनीस

atul sule 10 years, 5 months ago Verified Buyer

Re: Yin-Yang (e-book)

There was a mad scramble to read the book but Amita was first to finish! she liked each & every story & especially liked the unexpected yet pleasant twist at the end of each story.the story of Aesop depicts an artificially intelligent chip being more human than human beings.she immensely liked 'Pardafash",'cyclepatu' and 'Tejomegh Bernard' based on a true story.These stories have a unique blend of story writing skills of Jules Verne,H G Wells,R L Stevenson,Agatha Christy and O Henry! Who knows ten years down the line the scientific concepts mentioned in these science fictions may come into reality!