You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
ही एका नाथसिद्ध योग्याची सत्यकथा आहे. लेखक स्वत: श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या सिद्ध संप्रदायातील आहेत. योगी स्वत:चे अनुभव सहसा सांगत नाहीत. पण श्री विभाकर लेले (स्वामी योगेश्वरानन्द) यांनी या पुस्तकातून हातचे काहीही न राखता योग्यांना येणारे अनेकानेक अनुभव आणि अनुभूति योगसाधक आणि इतरेजनांच्या महितीसाठी आणि मार्गदर्शन व्हावे म्हणून यात प्रकट केले आहेत. योगातील कुंडलिनी आणि ज्ञानेश्वरांचा पंथराज यांबाबत व त्यामागील ज्ञानेश-तत्त्वज्ञानाबाबत अनुभवसिद्ध मार्गदर्शन त्यात आहे. शक्तिपातसाधकांच्या पण उपयोगाचे आहे. इतर योगविषयक ग्रंथातून जे मिळ्त नाही, संतांच्या लेखनातील जे सहजासहजी समजत नाही, ते लेखक सांगत आहेत. अभिज्ञ आणि चोखंदळ वाचक, योगी व योगसाधक, क्रिया व शक्तिपातसाधक, भक्त आणि ज्ञानी/कर्मयोगी या सर्वांनी जरूर वाचावा असा हा ग्रंथ आहे. विद्वान आणि ज्ञानेश साहित्याचे परिशीलन करणारे व अभ्यासक यांना हा ग्रंथ समजावून घेतल्याशिवाय ते ज्ञानेश वाङ्मय समजणे अवघडच आहे, इतका हा ग्रंथ उपयुक्त आणि त्यांच्या ज्ञानकक्षा वाढवणारा आहे. याचा पूरक ग्रंथही खासच आहे: तो आहे Pothi.com वरच असलेला ई-प्रत तसेच अग्दी उत्तमरीत्या छापलेला - 'योगदा श्री ज्ञानेश्वरी हा द्विखंडात्मक ग्रंथराज. अंंदाजे १४५० A-4 आकारांच्या पृष्ठांचा, double-column मध्ये सुवाच्य टंकात असलेला, सुंदर मुखपृष्ठाचा बृहद् ग्रंथराज ज्यात संपूर्ण ज्ञानेश्वरीचे विषयवार प्रबोधन, अम्रुतानुभवाचा विशेष भाग आणि माउली श्री ज्ञानेश्वर मुख्यत: आणि इतर संतांचे मिळून अदमासे ३०० योग-ज्ञान-भक्तिपर गूढ अनुभवांचे सार्थ सखोल विवरण करणारा हा ग्रंथ विद्वान आणि अभ्यासू यांच्यासह साधकांचा मर्गप्रदीप्च आहे जणू! सद्गुरु आता मिळत नाहीत. पण तरीही तेवढेच अनुभवाधारित मार्गदर्शन यात आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Eka Natha Siddha Yogyache Atmavritta (एका नाथसिद्ध योग्याचे आत्मवृत्त).