You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
"परिघाबाहेरून केंद्राकडे जाणाऱ्या एका तेजस्वी संघर्षाची आणि अदृश्य महात्यागाची गाथा."
एका प्रतिष्ठित घराण्याची वंशवेल, जिच्या नशिबाचा पहिला शिक्का जन्मतःच मारला गेला... पण नियतीच्या या खेळात जे दिसते, तेच सत्य असते का? हा प्रवास आहे अशा एका निगूढ शोधवेधाचा, जिथे मृगजळे विश्वासाला तडे देतात आणि नियती पावलोपावली धैर्याची कठोर परीक्षा घेते. काय होते त्या 'काळ्या संचिके'त? एका बाजूला धगधगती जिद्द आणि दुसऱ्या बाजूला एक भीषण पण उदात्त रहस्य.... ज्या अस्तित्वाचा जगाने उपहास केला, तेच उद्या कोणाच्या तरी महात्यागाचे सर्वोच्च प्रतीक ठरेल का?
जेव्हा सत्याचा हुंकार सुरू होतो, तेव्हा उलगडतो एक 'असामान्य'. विलक्षण शिखरावर पोहोचूनही अस्वस्थ जिवाला दाट धुक्यातून प्रकाशाच्या सुवर्णसंगमाकडे घेऊन जाणारी आणि मानवी भावनेच्या अथांग खोलीचा प्रत्यय देणारी ही साहित्याची एक अनमोल कलाकृती!
स्वत्व शोधणाऱ्या प्रत्येकासाठी एक अपरिहार्य — 'अस्तित्वाची शोधवेध'
लेखिका: प्रतिभा कोळपे
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book अस्तित्वाची शोधवेध ( THE QUEST FOR EXISTENCE ).