You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

मुलांसाठी संस्कार कथा

वय ८ ते १८ करिता
Rupali Dongre
Type: Print Book
Genre: Children
Language: Marathi
Price: ₹140 + shipping
Price: ₹140 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

मला माझ्या मुलाचे संगोपन करत असताना खूप लोकांची मदत झाली. माझा मुलगा अनयचे मित्र; काही जवळचे, काही दूरचे, त्याचे शिक्षक, मित्रांचे पालक या सर्वांची देखील खुप मदत झाली. येणाऱ्या समस्या, अडचणी त्यावर कशी मात करावी? मुलांना हट्टाच्या वेळी कसं त्यांचे मन कसे वळवावे? त्यांना संस्कार कसे करावे? हे सर्व, मुले वाढवत असताना मी शिकत होते. त्यांचे मन वळवण्यासाठी गोष्टींची कल्पना सुचली. त्यांचा उपयोग देखील झाला.
या गोष्टी मी एका संस्कार शिबिरामध्ये मुलांना सांगितल्या. तेव्हा ह्या गोष्टींचा मुलांवर खूप चांगला परिणाम होतो आहे हे मला जाणवले. त्याच गोष्टी मी आता शब्दांकित केल्या आहेत आणि सर्वांसमोर सादर करत आहे.
पालकांना देखिल ह्या गोष्टी मुलांवर चांगले संस्कार करण्याच्यादृष्टीने उपयोगी पडतील असा मला विश्वास आहे.

About the Author

रुपाली डोंगरे ह्या विज्ञानाच्या पदवीधर असून सर्टीफाइड कौन्सिलर आहेत. त्या फिंगर प्रिंट अनालीस्ट, रेकी शिक्षिका तसेच मुझिक थेरपीस्ट तसेच आहेत. नवीन पिढीवर चांगले संस्कार करणे, मुलांचे व पालकांचे समुपदेशन करून नवीन पिढी सुसंस्कृत करणे, घडवणे ह्यासाठी त्या सतत प्रयत्नरत असतात. त्यांनी मराठी व हिंदी मध्ये अनेक कथा व कविता लिहिल्या आहेत. त्यांनी चिदम्बरस्वामी ह्यांच्या जीवन चरित्रावर आधारित चिदंबरचालीसा लिहिली आहे.
त्यांना स्वयंपाकाची व संगीताची आवड असून त्यांचे पाकशास्त्राचे, आरत्या व स्तोत्रांचे युटूब चॅनल सक्रिय आहे. त्या निसर्गप्रेमी असून वृक्षारोपण व संगोपनासाठी कार्यरत आहेत. एका सुविद्य मुलाची आई आहेत. त्यांच्या मुलाने इंजिनिरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. आपल्या मुलावर योग्य संस्कार करण्यासाठी त्यांनी गोष्टी, कविता, म्हणी तसेच शब्दकोडे तयार केले. त्यापैकी काही गोष्टी ह्या पुस्तकात प्रकाशित केल्या आहेत.
त्यांचे पती देखिल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये पी.एच.डी. असून शासकीय तंत्रनिकेतन येथे विभागप्रमुख पदावर कार्यरत आहेत. त्या आपल्या पतीसोबत नागपूर येथे वास्तव्यास आहेत.

Book Details

Number of Pages: 58
Dimensions: 5"x8"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

मुलांसाठी संस्कार कथा

मुलांसाठी संस्कार कथा

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book मुलांसाठी संस्कार कथा.

Other Books in Children

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.