You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मध्यरात्रीचे धुके ही एक सत्य घटनेवर आधारित दिर्घ कथा माझ्या मनात अनेक वर्षांपासून घोळत होती. कराडच्या गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकतांना घडलेल्या एका चित्त थरारक प्रसंगावर मी ही कथा बेतलेली आहे. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी यामध्ये काहीतरी फरक असतोच हा माझा स्वानुभव. साहसी प्रवृत्तीमुळे तारुण्यात आपण अशा अनेक गोष्टी करून जातो ज्याच्या दूरगामी परिणामांची जाणीव आपणास त्यावेळी होत नाही. कुठल्याच गोष्टींच्या परिणामांची तमा न बाळगणारी युवा पिढी प्रौढावस्थेत गेल्यावर त्याच गोष्टींच्या बाबतीत विचार करायला देखील कचरते हा देखील माझा अनुभव आहे.
आपल्या आजूबाजूस अनेक निरनिराळ्या प्रवृत्तींच्या व्यक्ती वावरत असतात. बरेचदा नकळतपणे आपण अशा व्यक्तींच्या सहवासात येतो ज्यामुळे आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते.
रोमांचक अनुभव घेणे हा युवा पिढीचा पिंडच असतो.अशाच दोन मित्रांची कथा आहे मध्यरात्रीचे धुके.
या कथेतून जातांना वाचकांना देखील आपण घडलेल्या प्रसंगाचा भाग आहोत असे जाणवू शकेल.
असे अनपेक्षित संकट आपल्यावर ही येऊ शकते याची अनुभूती वाचकांना ही कथा वाचताना नक्की होईल.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book मध्यरात्रीचे धुके.