You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
राहुल आणि विशाखा बरसोलमध्ये राहायला येतात. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या सुखी दाम्पत्याच्या संसारावर मात्र विशाखाच्या मानसिक आजाराची जुनी, काळी सावली आधीपासूनच दाटलेली असते.
बरसोल हे राहुलचं आजोळ. त्याच्या बालपणीच्या असंख्य आनंदी आठवणी या गावाच्या मातीशी जोडलेल्या आहेत. पण गावात परतताच भूतकाळ जणू पुन्हा जागा होतो. विशाखाची भेट तिची बालमैत्रीण सोनालीशी होते… आणि त्याच वेळी विशाखाच्या आजाराची लक्षणं पुन्हा डोकं वर काढू लागतात.
विशाखाची काळजी घेण्यासाठी राहुल रोहिणीला घरकामासाठी ठेवतो. पण आपल्या अस्पष्ट आणि काहीशा गूढ बोलण्यातून रोहिणी विशाखाच्या मनात सोनालीविषयी संशयाचं जाळं विणू लागते. राहुलला सोनाली आपल्यापासून हिरावून घेत आहे, हा विचार विशाखाच्या मनात हळूहळू रुजतो… आणि मग तिच्या प्रत्येक श्वासावर, प्रत्येक नजरेवर आणि प्रत्येक शब्दावर संशयाचं सावट पसरतं.
विशाखाचं वागणं दिवसेंदिवस अधिक अनाकलनीय होत जातं. घरातल्या शांततेला कुजबुजींची, सावल्यांची आणि न सांगितलेल्या रहस्यांची किनार लाभते. राहुलसोबतच्या तिच्या नात्यात तडे पडू लागतात—पण त्या तड्यांमधून बाहेर डोकावतंय नेमकं काय?
हा केवळ विशाखाच्या मानसिक आजाराचा पुन्हा झालेला उद्रेक आहे, की बरसोलच्या काळोख्या भूतकाळात वैज्ञानिक तर्काच्या पलीकडचं एखादं भयंकर गूढ सत्य दडलं आहे?
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book अयाचित.