पंचकन्यायेतं असे जीची स्मरणी अशा मंदोदरी ची ही एक निशब्द कहाणी मयासूयाची कन्या लंकाधिशाची
राणी पतीनिष्ठ अशी ही नारी ही सहधर्मचारिणी तिच्या अंतरीची व्यथा घेऊया जाणुनी अशी कशी ही मंदोदरी झाली तिची निशब्दवाणी .डॉक्टर अनिता गुप्ते यांनी लिहिलेली मंदोदरी एक निशब्द कहाणी हे पुस्तक अतिशय सुरेख आहे खरोखरी आपल्याला मंदोदरी ची काहीच माहिती नव्हती भाषा ओळख ओघवती आणि सुरेख आहे सर्वांनी जरूर हे पुस्तक वाचावे धन्यवाद!!
Dr. Anita Gupte ह्यांनी लिहिलेली ही कादंबरी....वाचायला सुरुवात केली आणि मग ह्या कथेत असा काही interest आला कि पुस्तक सोडायची इच्छाच होई ना. मंदोदरी चं एक आगळं वेगळं रूप आपल्या डोळ्या समोर उभे राहिले. हे चरित्र साकारण्या साठी लेखिके नी घेतलेली विशेष मेहनत स्पष्ट दिसते. प्रत्येक character, मग तो रावण असो की मेघनाद, कुंभकर्ण असो की विभिषण ची पत्नी सरमा , बरोबर न्याय केलं आहे.
भाषा अगदी सहज, सुंदर आणि freeflowing. त्यामुळे ही कादंबरी सुरू झाली की आपण त्यात वाहत जातो , त्यातून कथानक इतकं सुंदर आहे की कादंबरी उचलली की खाली ठेवायची इच्छाच होत नाही.
लेखिकेला खूप खूप शुभेच्छा.
आत्ता चार दिवसापूर्वीच ही कादंबरी हातात आली आणि वाचायला सुरुवात केली. लेखिका अनिता गुप्ते ह्यांची ही दुसरी कादंबरी...मन्दोदरी ची एक वेगळीच ओळख आपल्याला ह्या कादंबरीतून होते. रावणाची पत्नी एवढीच ओळख नसून ती एक हुशार वास्तुविशारद,अतिशय सुंदर,पतिव्रता आणि राजकारभारात दक्ष अशी कर्तृत्ववान स्त्री होती. तिची ही नवीन ओळख होते ह्या कादंबरीतून. तसंच रावण, कुंभकर्ण, विभीषण ,रावणाची आई कैकसी ,रावणाची बहीण मीनाक्षी ह्या सगळ्यां बाबत इत्थंभूत माहिती आपल्याला इकडे मिळते. ह्या कादंबरीतील प्रत्येक पात्र लेखिकेनी पूर्ण न्याय केला आहे.
लेखिकेनी अगदी साध्या भाषेत इतकं रोचक वर्णन केलंय कि पुस्तक खाली ठेवायची इच्छाच होत नाही. तिची कथानकावर ची पकड़ शेवट पर्यंत कसलेली आहे आणि म्हणूनच आपण ह्या कादंबरीत अक्षरशः आकण्ठ बुडून जातो.
Beautiful story (Mandodari) with beautiful pictures in it. Very deep information about ancient times and more about Sri Lanka. Must read
अनोळखी मंदोदरी सोबत ओळख
अभिनंदन लेखिका डॉ. अनिता गुप्ते यांचे. इतके सुंदर, पारंपरिकता दाखवणारे, पुर्वीच्या काळात घेऊन जाणारे पुस्तक लिहिल्या बद्दल ... पुस्तक वाचायला चालू केल्यावर वाचतच राहावे असे वाटते इतक छान लिहिलंय. लेखिकेचा सखोल अभ्यास मंदोदरी वरचा, त्यामुळे पहिल्यांदा च मंदोदरी नीट समजली. आता पर्यंत सीता, द्रौपदी यांच्या विषयी माहिती होती पण मंदोदरी बद्दल अजिबात काहीच माहीत नव्हते.... फक्त रावणाची बायको यापलीकडे जाऊन तिची ओळख या पुस्तकामुळे झाली !!!!